न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पावसाने वादळी वा-यासह हजेरी लावली. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन (पोस्ट मार्टम) विभागातील कोल्ड स्टोरेजचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वा-याच्या तडाख्यामुळे शवविच्छेदन विभागाजवळील झाड उन्मळून पडले.
शवविच्छेदन विभागातील विद्युत पुरवठा करणा-या यंत्रणेवर हे झाड पडले. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन या विभागाचा वीज पुरवठा शुक्रवारी रात्रभर खंडित झाला. तसेच शवविच्छेदन विभागातील कोल्ड स्टोरेजचा विद्युत पुरवठाही बंद पडला होता. या कोल्ड स्टोरेजमध्ये १६ मृतदेह ठेवण्याची क्षमता असून शुक्रवारी रात्री ५ मृतदेह ठेवण्यात आले होते.
वायसीएम रुग्णालयातील शव विच्छेदनमधील कोल्ड स्टोरेजचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी झालेल्या वादळी पावसात झाड पडून हा वीजपुरवठा खंडित झाला. आता हा पुरवठा सुरळीत केला आहे. – डॉ. आर. वाबळे (वायसीएमचे अधिष्ठाता)













