न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- युनिक व्हीजन इंग्लिश मेडीयम स्कुलच्या प्रथम बॅचचा s.s.c. बोर्डाचा निकाल १००% लागला. ७४% विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (डिस्टिंगशन) व २६% विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (फर्स्टक्लास) मिळवून यश संपादन केले.
युनिक व्हीजन इंग्लिश मेडीयम स्कुलची ही पहिलीच बॅच असल्यामुळे पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पेढे भरवून सर्वांनी आनंद व्यक्त केला. युनिक व्हीजन स्कूलच्या पहिल्या बॅचच्या यशामध्ये संस्थेच्या मुख्याध्यापिका रजनी दुवेदी, प्रा.मनीषा बलकवडे, सिरील जगन, धना भोळे , श्रद्धा भालेकर, विशाखा वांगीकर, सरिता रहाटे या सर्व शिक्षक वृंदानी भरपूर मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना या यशापर्यंत पोहोचवले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, डॉ. आनंद मेहेंदळे, संस्थेचे अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व परिपूर्ण सहकार्य केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, मुख्याध्यापिका रजनी दुवेदी व नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.











