न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २० मार्च २०२६) :- काळेवाडी येथे प्लॉट विक्री व्यवहारात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, सत्यम डेव्हलपर्सच्या कार्यालयात आरोपी पूर्वी काम करत होते. दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी भागीदारी संपुष्टात आल्यानंतरही फिर्यादीने विश्वासाने विक्रीचे काम त्यांच्याकडेच सोपवले होते.
मात्र २५ जानेवारी २०२५ ते २३ मे २०२५ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून प्लॉट खरेदीदारांकडून कंपनीच्या नावाने पावत्या देत पैसे स्वतःच्या व नातेवाईकांच्या बँक खात्यात तसेच रोख स्वरूपात घेतले. सुमारे ५२ लाख ४३ हजार ५०० रुपयांची रक्कम अपहार करून त्यांनी विश्वासघात व फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.








