- नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे विविध विभागांना स्पष्ट निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षम, जलद आणि परिणामकारक पद्धतीने मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने प्राधान्याने काम करावे, असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले.
इ क्षेत्रीय कार्यालयातील संत ज्ञानेश्वर महाराज सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, कर संकलन व विद्युत विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि सुरू असलेल्या विकास प्रकल्पांवर चर्चा झाली.
नगरसदस्यांनी मांडलेल्या समस्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देत, पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, स्वच्छता व आरोग्य सेवा सक्षम करणे आणि पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले.















