न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अभय योजना’ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले. या योजनेमुळे नागरिकांना थकीत मालमत्ता करावरील विलंब शुल्कात मोठी सवलत मिळत असून, आर्थिक दिलासा मिळत आहे.
महापौर लांडगे म्हणाले की, या योजनेला मिळणारा प्रतिसाद हा नागरिकांचा महानगरपालिकेच्या प्रशासनावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. अनेक नागरिकांनी पुढाकार घेत थकीत कर भरून आपली देणी कमी केली आहेत.
ही योजना विशेषतः आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे अद्याप मालमत्ता कर बाकी आहे, त्यांनी ३१ मार्चपूर्वी या योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक बचत करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.


















