न्यूज पीसीएमसी नेटवर्क
जांबे (दि. २१ मार्च २०२६) :- मुळशी तालुक्यातील जांबे येथील बांधकाम प्रकल्पातून तब्बल २ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादी सुधीर वरेकर (वय ५१, रा. पुणावळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांची जागा विकासासाठी घेऊन विश्वास संपादन केला. मात्र, विकास काम पूर्ण झाल्यानंतर जाणीवपूर्वक करार करण्यास टाळाटाळ करत मोठी आर्थिक फसवणूक केली.
तसेच आरोपींनी बांधकाम साईटवर जबरदस्तीने प्रवेश करून फ्लॅट्सचे कुलूप तोडले, सीसीटीव्ही व अन्य साहित्याचे नुकसान करत सुमारे ४० लाखांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास सपोनि सावंत करत असून, पुढील कारवाई सुरू आहे.








