न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 21 मार्च 2026) :- मोशी येथील बो-हाडेवाडी परिसरात रविवारी (दि.२२) आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष वाहतूक बदल लागू केले आहेत. रामा ग्रुप चौक, युटोपिया सोसायटी शेजारील शिवरस्ता परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रदीप स्वीट कॉर्नर ते सिल्वर गार्डेनिया सोसायटी तसेच माऊली भेळ ते शिवरोड या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
वाहनचालकांसाठी लक्ष्मी चौक, कुमार प्रथम सोसायटी, हॉटेल क्राऊन पॉईंट आदी मार्गांचा पर्याय म्हणून वापर सुचविण्यात आला आहे. सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील. नागरिकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








