न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. २४ मार्च २०२६) :- दापोडी येथील पवार वस्तीत ईदनिमित्त लावलेल्या स्पीकर कार्यक्रमादरम्यान अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ मार्च रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तौहीद तस्दीक अली खान (वय १५, रा. खडकी) हा आपल्या नातेवाईकांसोबत कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. यावेळी जुन्या वादातून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी लोखंडी कड्याने कपाळावर मारहाण केली तसेच लोखंडी कोयत्याने डोक्याच्या मागील भागावर वार करून त्याला गंभीर जखमी केले.
या प्रकरणी शिफ्टेन खान, आझाम खान, सुफियान अन्सारी व उमर (पूर्ण नाव अज्ञात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवळे करीत आहेत.








