- पतीकडून पत्नीवर दगडाने जीवघेणा हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २४ मार्च २०२६) :- निगडी परिसरात पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास वेलो कंपनी, निगडी येथून काम करून बाहेर पडलेल्या महिला फिर्यादीवर तिच्या पतीने हल्ला केला. “तू मला सोडून दुसऱ्यासोबत राहतेस, आज तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपी महादेव जाधव (रा. रावेत) याने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड उचलून फिर्यादीला खाली पाडले व तिच्या डोक्यावर वारंवार प्रहार केले.
या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दि. २३ मार्च रोजी पहाटे गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.








