न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२६) :- पिंपरीतील वल्लभनगर परिसरात रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाने कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ मार्च रोजी सकाळी सुमारे ११.४० वाजता सुभाष अमृतकर (वय ६९) हे आपल्या मुलगा मयूर व सून निकिता यांच्यासोबत ओला अॅपद्वारे रिक्षा (एमएच १४ एलएस ०४५७) बुक करून घरी आले होते. यावेळी चालकाने जादा भाडे मागितल्याने वाद निर्माण झाला. संतप्त झालेल्या चालकाने रिक्षामधील लाकडी फळी काढून मयूर यांच्या डोक्यावर मारहाण केली.
वडील सुभाष अमृतकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या छातीवर फळीने वार करत नाक व छातीवर मारहाण केली. तसेच सून निकिता यांनाही ढकलून देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.








