न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ मार्च २०२६) :- निघोजे येथील गणपती मंदिराजवळ भरधाव स्विफ्ट कार चालकाने एका ड्रायव्हरवर गॅस टाकी व दगडाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. २५ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. नंदु भारत सांगोलकर (वय ३०, रा. लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. स्विफ्ट चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत आल्याने फिर्यादीने घाबरून बोनेटवरून उडी मारल्याने ते बाजूला पडले. यानंतर वाद झाल्याने आरोपीने गॅसची टाकी फेकून तसेच दगडाने कपाळावर मारून जखमी केले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली.
या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून आरोपी फरार आहे. पोना बांगर तपास करत आहेत.








