- भक्तामर पठनाने मंगलमय वातावरणात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ मार्च २०२६) :-पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अहिंसा सप्ताहाची सुरुवात कासारवाडी येथील पगारिया सभागृहात भक्तामर पठनाने आणि प्रार्थना करून करण्यात आली. या भक्तामर पठण कार्यक्रमांमध्ये सुमारे अडीचशे भाविकांनी सहभाग घेतला. यावेळी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कासारवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष विलास कुमार पगारिया यांनी उपस्थितांचे आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत केले. महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी सप्ताहात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली आणि कासारवाडी जैन श्रावक संघ आणि पार्श्वनाथ युवक मंडळ यांनी संयोजनासाठी पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे स्वागत केले.
संयोजक किरण भंडारी, मयुर पगारिया, पंकज कांकरिया यांचा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याच दिवशी दुपारी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी भोसरीच्या वतीने विश्र्वशांती परिषदेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले. परिषदेचे उद्घाटक सरहद्दचे अध्यक्ष संजय नहार, अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस व स्वागताध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया होते.
गुरुवारी चिंचवड येथील आनंद विद्या प्रसारक मंडळाच्या इमारतीसमोरील चौकात स्वानंद महिला संस्थेच्या वतीने पाणपोई उभारण्यात आली त्याचे उद्घाटन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया ,संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, नगरसेविका आशा सूर्यवंशी, माजी अध्यक्ष सूर्यकांत मुथियान, विलास कुमार पगारिया व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी स्वानंद संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
श्रेयस कटारिया यांनी पाणपोई यापुढे डिजिटल अर्थात एटीएम पाणपोई सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये पाण्याची एक लिटर ची पूर्ण बॉटल फक्त पाच रुपयात भरून मिळेल असे सांगितले.
या कार्यक्रमानंतर दुपारी खेड तालुक्यातील पांगरी या गावी सावली निवारा संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शांताई सदन आणि स्व फुलचंदजी बेदमुथा यांच्या स्मरणार्थ निर्मित भोजन शाळा यांचे उद्घाटन झाले. यावेळी निवारा संस्थेचे अध्यक्ष एम एफ हुसेन यांनी या प्रकल्पाची माहिती दिली व एकूण ६० निराधार ज्येष्ठ नागरिकांची त्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे हे सांगितले. त्यांच्या या मानवसेवेच्या कार्याचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. महासंघाच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला आणि या प्रकल्पासाठी सढळ हाताने मदत करणारे नितीन, शुभम सोनिगरा, अनुप नहार आणि नितीन ऋषभ, सौरभ बेदमुथा परिवार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. निगडी प्राधिकरण संघाचे सुभाष ओसवाल, संतोष गुगळे, अशोक नहार, श्रेणिक मंडलेचा , सुभाष सुराणा यांचाही सन्मान करण्यात आला. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोक कुमार पगारिया, माजी अध्यक्ष नितीन बेदमुथा, माजी अध्यक्ष विलास पगारिया. विद्यमान अध्यक्ष श्रेयस पगारिया, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी यांनी हुसेन यांच्या कामाचे कौतुक करून देणगीदार परिवारांना धन्यवाद दिले. भक्तामर पठण कार्यक्रमाच्या वेळी “आपनो राजस्थान “कार्यक्रमाचे संयोजक विजय जैन, संगीतकार रवि जैन आणि निशा लढ्ढा यांचाही सत्कार करण्यात आला.
















