- कामगाराच्या पत्नीची पोलिसात धाव…
- कॉन्ट्रॅक्टरने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुनावळे (दि.२७ मार्च २०२६) :- पुनावळे येथील बांधकाम साईटवर काम करत असताना एका कामगाराचा पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती उत्पल मनीकांत अधिकारी (वय ४५) हे पुनेविल्ले कन्स्ट्रक्शन साईटवर सेंटरिंगचे काम करत होते. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास काम करत असताना ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
सदर साईटवरील कॉन्ट्रॅक्टर पंकज पुलीन मंडल (रा. मारूंजी) याने कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सेफ्टी जाळी, जॅकेट व इतर साधनांची योग्य व्यवस्था केली नसल्याचा आरोप आहे. निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे समोर आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिळे करत आहेत.
















