न्युज पीसीएमसी नेटवर्क
निघोजे (दि.२७ मार्च २०२६) :- निघोजे गावच्या हद्दीत तळवडे-म्हाळुंगे रोडवर बसमधील किरकोळ कारणावरून एका युवकावर चौघांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रसाद तुकाराम टेके (वय २१, रा. चाकण) हे सेकंड शिफ्ट संपवून बसने घरी जात होते. यावेळी बसमधून कोणीतरी थुंकल्याने ते एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पडले. या कारणावरून दुचाकीवरील आरोपींनी बस अडवून वाद घातला.
फिर्यादी खाली उतरल्यानंतर आरोपी स्वप्नील हजारे व त्याच्या तीन साथीदारांनी हात, पट्टा व कड्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून डोळे, चेहरा व पाठीवर जखमा झाल्या आहेत.
याप्रकरणी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत आरोपी फरार झाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.








