- सोसायटीचा हलगर्जीपणाचा नडला…
- तब्बल जणांविरोधात गुन्हा दाखल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. २९ मार्च २०२६) :- तळेगाव दाभाडे येथील एका हौसिंग सोसायटीत लिफ्ट कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रितेश सुरंगे (वय ३२, रा. किवळे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ दिनेश सुरंगे हा ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता. तो लिफ्टने खाली जात असताना सहाव्या व सातव्या मजल्यामध्ये लिफ्ट अडकली. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अचानक लिफ्टचा दोर तुटून लिफ्ट खाली कोसळली.
या अपघातात दिनेश सुरंगे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अथर्व हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेला सोसायटीच्या बी विंगचे चेअरमन यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यांचा निष्काळजीपण व हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि खामगळ करीत आहेत.








