- अंतर्गत कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मार्च २०२६) :- भोसरी परिसरात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) अंतर्गत कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून ५ लाख ४६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शांताराम मारुती शिर्के (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सोमनाथ पठारे (वय ४०) आणि शुभम पाटील (वय ३०, दोघेही रा. भोसरी) यांनी २०२३ पासून ऑक्टोबर २०२५ दरम्यान योगिराज असोसिएट, पुणे-नाशिक हायवे येथे हा प्रकार केला.
आरोपींनी कर्ज मंजुरी व सबसिडी मिळवून देण्यासाठी बँक व जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून फिर्यादी व इतरांकडून वेळोवेळी रक्कम उकळली.
या प्रकरणाचा तपास पोउनि खाडे करीत आहेत.
















