- जुन्या सांगवीच्या पवनानगरमधील हृदयद्रावक घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ एप्रिल २०२५) :- सांगवी परिसरातील जुनी सांगवी येथील पवनानगर, दत्त मंदिराजवळील बांधकामस्थळी निष्काळजीपणामुळे तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्च रोजी रात्री घडली. मनोज विश्वकर्मा (वय २२) यांची मुलगी कु. प्रियंका (वय ३ वर्षे ९ महिने) ही उघड्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यूमुखी पडली.
संबंधित बांधकामस्थळी पाण्याची टाकी उघडी ठेवण्यात आली होती आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी मनिष पवार, जयराम कांबळे आणि वसंत बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत.










