- पिंपरी चिंचवड महापालिकेची पोलिसात धाव...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ एप्रिल २०२५) :- काळेवाडी परिसरातील थेरगाव येथील जगतापनगरमध्ये अनधिकृत भराव केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०२५ पासून १ एप्रिल २०२६ पर्यंत उघडकीस आली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता पंकज धेंडे (वय ३७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी शुभम ओव्हाळ व महिला आरोपी यांनी मोकळ्या जागेत अनधिकृतपणे भराव टाकण्याचे काम सुरू ठेवले. याबाबत महानगरपालिकेकडून नोटीस देऊनही त्यांनी काम थांबविले नाही.
परिणामी, त्या ठिकाणच्या नाल्यात माती जाऊन नाला अरुंद झाला असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि निंबाळकर करीत आहेत.










