न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ एप्रिल २०२५) :- एमआयडीसी भोसरी परिसरातील महात्मा फुलेनगर येथे १ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास करणीच्या संशयातून झालेल्या वादात महिला व तिच्या मुलावर मारहाण व तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
३४ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आपल्या मुलीस घेण्यासाठी गेली असता तिची जाऊ हिने करणी केल्याचा आरोप करत वाद घातला. वाद वाढत असताना आरोपी आमन व एका विधीसंघर्षित अल्पवयीन मुलाने फिर्यादी व तिच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली.
त्यानंतर अल्पवयीन मुलाने घरातून तलवार आणून फिर्यादीच्या मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.










