न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ एप्रिल २०२५) :- हिंजवडी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एमडी ड्रग्ससह दोघांना अटक केली आहे. २४ मार्च २०२६ रोजी गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे वाकड येथील विनोदे वस्ती परिसरात सापळा रचण्यात आला.
यावेळी अतुल शंकर बालगुडे (वय ३५, रा. मावळ) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४२ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ (किंमत ४.२० लाख रुपये) व चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुढील तपासात त्याचा साथीदार शारुख उर्फ सद्दाम अन्सारी (रा. गोवंडी, मुंबई) यालाही २०० ग्रॅम एमडीसह अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण २७.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करत आहेत, अशी पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ च्या वतीने देण्यात आली आहे.










