न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ एप्रिल २०२६) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष व माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बहल यांनी शिवरायांच्या नैतिकता, पराक्रम व प्रजाभक्तीच्या विचारांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. भ्रष्टाचारमुक्त समाज, महिलांचा सन्मान आणि राष्ट्रनिष्ठा हीच खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळ, शिस्तबद्ध राज्यकारभार व सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वांचा गौरव केला. कार्यक्रमास अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










