- आ. महेश लांडगे यांनी घेतला प्रकल्पाच्या कामांचा आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन भामा-आसखेड पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी जानेवारी २०२७ची मुदत निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. जलउपसा केंद्रातील जॅकवेलचे काम पूर्ण झाले असून पंप हाऊस, सबस्टेशन आदी कामे प्रगतीपथावर आहेत. रावेत व निघोजे बंधाऱ्यातील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत आधुनिक टर्शरी ट्रीटमेंट यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच निगडी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ करण्यावर भर देण्यात आला.
जलवाहिनी कामातील विलंबाबाबत ठेकेदारावर कारवाईचा इशारा देत, प्रकल्पाची ट्रायल सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सुरू करून वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.










