न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ एप्रिल २०२६) :- आयटी हब आणि वेगाने विकसित होणारे नागरी केंद्र म्हणून ओळख असलेल्या पिंपळे सौदागर परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजुरीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे.
पोलीस आयुक्तालयाने यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून, आ. शंकर जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
या प्रयत्नांमुळे नवीन पोलीस ठाण्यासह ‘परिमंडळ ४’ चा प्रस्तावही पुढे आला आहे. यामुळे पोलिसांची गस्त वाढून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळेल, तसेच नागरिकांना तक्रारींसाठी अधिक सोय उपलब्ध होणार आहे.
“वाढती लोकसंख्या, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि व्यावसायिक विस्तार यामुळे कायदा व सुव्यवस्थेची गरज वाढली होती. सध्या जवळच्या पोलीस ठाण्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत होता. ही अडचण लक्षात घेऊन स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी करण्यात आली होती. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून या निर्णयामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक अधिक सुरक्षित होतील. – शत्रुघ्न काटे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक – मनपा…










