- पिंपरी चिंचवड, भोसरी, मावळ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ एप्रिल २०२६) :- शिवसेना संघटनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येईल, असा इशारा संपर्कप्रमुख व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. कार्यकारिणी बरखास्त करून सर्व पदाधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील ३० दिवस त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.
थेरगाव येथे झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श ठेवून काम करण्याचे आवाहन करण्यात आले. चांगले काम करणाऱ्यांना पदावर कायम ठेवले जाईल, तर निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
श्रीरंग बारणे यांनी संघटना बळकट करण्यावर भर देत पदापेक्षा विचारांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. आगामी काळात निवडणुका नसल्याने संघटना मजबूत करण्याची ही मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.










