खून, दरोडा, अपहरणासह गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने धोकादायक गुन्हेगारांविरोधात कडक पाऊल उचलत एमपीडीए कायद्यान्वये चार सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
रामदास साळुंके, अर्जुन राठोड, शरद मोरे आणि रजीत येरकर या गुन्हेगारांचा अभिलेख तपासून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, अवैध दारू विक्री आणि शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित पोलीस ठाण्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या चौघांना प्रत्येकी एक वर्षासाठी विविध मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२६ च्या जानेवारी ते मार्च दरम्यान अशा चार कारवाया करण्यात आल्या असून २०२५ मध्ये एकूण ३५ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण येण्यास मदत होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.










