न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :-काळेवाडी परिसरातील रहाटणी येथे बीआरटी लेनमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने भीषण अपघात घडला असून एकाचा मृत्यू तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ३ एप्रिल रोजी रात्री सुमारास शिवार चौकात घडली.
पीएमटी बस चालक नागेश गायकवाड हे बस चालवत असताना समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाने नो-एन्ट्रीत प्रवेश करून वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक ब्रेक मारल्याने दुचाकी घसरून बसला जोरात धडकली.
या अपघातात दुचाकी चालक अभिषेक शेरमाळे याचा पाय फ्रॅक्चर झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. तर मागे बसलेला सागर देवरे (वय ३०) याचा मृत्यू झाला. काळेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.










