न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगांव :- नगरसेवक सुरेश भोईर व महाराष्ट्र महावितरण सदस्य, मधुकर बच्चे यांच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त चिंचवडगाव परिसरात प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी ब प्रभागातील चिंचवडगाव, चापेकर चौक ते गांधी पेठ येथे नागरिकांना प्लास्टिकचा वापर करू नये, व्यवहारात प्लास्टिकचा वापर टाळावा याकरिता मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांना आवाह्न करण्यात आले व पेठेतील व्यापारी बांधवांना भेटून प्लास्टिकचा वापर करू नये याबाबत जनजागृती करण्यात आली.
प्लास्टिकबंद अभियानात महाराष्ट्र महावितरण सदस्य, मधुकर बच्चे, नगरसेवक:सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, विठ्ठल भोईर, दत्ता चिंचवडे, दत्ता भोईर, मुख्य आरोग्य अधिकारी पारोल, कांचनकुमार इंदलकर, सर्व सफाई कर्मचारी व परिसरातील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आदींनी सहभाग नोंदवला.