- मालमत्ता कर संकलनात विक्रमी वाढ; १८ विभागीय कार्यालयांचा सन्मान…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :- रवि लांडगे यांनी नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात मोठी वाढ झाल्याचे सांगितले. निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच २०२६-२७ साठी कर बिल वाटप मोहिमेसाठी महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यात आले.
विजय सूर्यवंशी यांनी ‘परफॉर्मर ऑफ द डे’ उपक्रमामुळे स्पर्धात्मक कामकाज वाढल्याचे सांगितले. यंदा सुमारे ९६१ कोटी रुपयांची वसुली झाली असून ५ लाखांहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन कर भरला.
‘अभय योजना’ला मोठा प्रतिसाद मिळत सुमारे ७० हजार मालमत्ताधारकांनी लाभ घेतला. महिला बचत गटांच्या सहभागामुळे महसूल वाढीसह महिलांच्या रोजगारालाही चालना मिळाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.










