न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड संगीत अकादमीच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात शहराचा नावलौकिक होवून भविष्यात शहरातून अनेक नामवंत कलाकार निर्माण होण्यास मदत होईल, असे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.
आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संगीत अकादमीच्या १९ व्या वर्धापन दिनाचे उदघाटन जगतगुरु श्री.संत तुकाराम महाराज व्यापारी संकुल, निगडी येथे त्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहय्यक आयुक्त आशा राऊत, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, माहिती व जनसंपर्कचे प्र.प्रशासन
अधिकारी रमेश भोसले, क्रिडा पर्यवेक्षक आशा ढवळे, विश्वास गेंगजे, राजू कोतवाल, सुभाष पवार, अनिता केदारी, जयश्री भोज, संगीत शिक्षक वैजंती भालेराव, वैशाली जाधव, सीमा देशमुख, संतोष साळवे, विनोद सुतार, मिलिंद सुतार, रविंद्र कांबळे, मिंलींद दलाल,उमेश पुरोहित आदी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर हे औदयोगिक नगर म्हणून नावारुपाला आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संगीत आकदमीमुळे शहराचा नावलौकिक वाढत आहे. तसेच शहरातील गोरगरीब मुलांना संगीताची गोडी लागून अनेक वादय, गायन इ. संगित शिक्षणाचा लाभ होत आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले एखादी संगीत संस्था १९ वर्षे निरंतर सेवाकरत आहे. ही बाब आव्हानात्मक असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संगीत अकादमीच्या माध्यामातून ही सांस्कृतिक सेवा होत असल्याचा शहर वासियांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. गाणं म्हणना-या बरोबरच गाणे ऐकणाराही तेवढाच दर्दी कलाकर असतो. गाणं ऐकणा-याला योग्य ठिकाणी दाद देता आली पाहिजे व तो कुठे चुकला हे ही ओळखता आले पाहिजे. संगीत क्षेत्रात ज्या प्रमाणे गायक आणि वादक रसिकश्रोत्यांना साद घालतात त्याच प्रमाणे रसिकश्रोत्यांमध्ये त्यांचे पडसाद अमटत
असतात. मोझाड हा वेस्टर्न संगीतातला प्रसिध्द संगीतकार होवून गेला. त्यांने वयाच्या तिस-या वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत दररोज दहा तास रीयाज करुन एकूण दहा हजार तास त्याने रीयाज करण्यासाठी श्रम घेतले. असे श्रम संगीत क्षेत्रात नावलौकीक कमवण्यासाठी तुम्ही सर्व संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व विदयार्थ्यांनी केले पाहिजे असेही ते त्यावेळी म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहरात क्लासिकल संगीता बरोबर वेस्टर्न संगीतावरही काम झाले पाहिजे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विदयार्थ्यांसाठी दरवर्षी महानगरपालिकेच्या वतीने शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, व वादयवृंद स्पर्धा वयानुरुप झाल्या पाहिजेत असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी अनेक विदयार्थ्यांनी गाणी गावून रसिकांना मंत्रमूग्ध्द केले. संगीत शिक्षक वैजंती भालेराव यांचे शिष्य सुवर्णा भोंडे यांनी सुगम संगीत या प्रकारात उंच माझा झोका हे गाणे गावून रसिकांची दाद मिळविली. उमेश पुरोहित, संतोष साळवी यांनी गायनास साथ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रिडा पर्यवेक्षक जयश्री साळवे यांनी केले. तर आभार क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी मानले.














