न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा पिंपरी येथे सत्कार करण्यात आला. युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांनी पुष्पगुच्छ देऊन दानवे यांचा सत्कार केला.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, संतोष कलाटे, नवीन लायगुडे यांच्यासह युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दानवे यांनी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद ही त्यांच्या युवा कार्यकर्त्यांमुळेच असते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही युवा कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भारतीय जनता पक्षाला दैदिप्यमान यश मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासून कंबर कसून कामाला लागावे व आमदार लक्ष्मण जगताप यांना पुन्हा एकदा आमदार करण्यामध्ये आपला मोलाचा वाटा उचलावा. या शब्दात दानवे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.














