न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखलीमधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी (दि. ७) रोजी दुपारी सात जणांच्या टोळक्याने त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी साने यांच्या कार्यालयास आज मंगळावर (दि. ११ जून) रोजी धावती भेट दिली.
या भेटीत महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पवार यांना माहिती देताना सांगितले की, चिखली पोलिसांसोबत या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत आहे. परंतु, या तपासाला दिशाहीनता दिली जात आहे. पोलीस तपासाची दिशा बदलत आहेत. ऑफिसमध्ये वाद होण्याचे काहीच कारण नाही. हे वीजबील भरणा केंद्र आहे. पोलिसांची तपासाची दिशा चुकीची आहे. खरे कारण माझ्या राजकीय हितशत्रूंचा मला मारण्याचा प्लान होता, अशी सूत्रांकडून मला महितीही मिळाली होती. त्यामुळे ही घटना घातपाताचा प्रकार होता, असे साने यांनी पार्थ यांना सांगितले.
पार्थ यांनी बोलताना सांगितले की, पोलिसांनी तपासाची सूत्रे योग्य दिशेने करावीत. तसेच एक पक्ष म्हणून आम्ही साने यांच्याबरोबर आहोत. हे राजकीय षड्यंत्र असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.














