न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाणारी वाहतुक गुरुवारी २ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ओव्हरहेड ग्रॅंट्री बसविण्याच्या कामासाठी दुपारी १२ ते २ या कालावधीत दोन तासासाठी बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती महामार्ग सुरक्षा पुणे प्रादेशिक विभागाचे पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली आहे.
द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई मार्गावरील लेनवर ६५.५०० या किमी येथे ओव्हरहेड गॅंट्री बसविण्यात येणार आहे. त्यासाठी १३ मे रोजी दुपारी १२ ते २ या दरम्यान मुंबईकडे जाणारी सर्व वाहतुक २ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. यावेळी सर्व प्रकारची अवजड वाहने व मालवाहतुक करणारी वाहने ६६ कि.मी. जवळ थांबविण्यात येणार आहेत.
हलकी वाहने व चारचाकी वाहने जुन्या महामार्गावर वळविण्यात येणार तर हलकी चारचाकी व प्रवासी वाहने द्रुतगती मार्गावर किवळे ब्रिज येथून जुना पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबईकडे वळविण्यात येणार आहेत. त














