न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- डांगेचौक, गणेश नगर, वाकड रस्ता, थेरगाव परिसरात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना जाहिरात पोस्टर व स्टिकर्स लावून शहराच्या सौंदर्यास बाधा आणून विद्रुपीकरण केल्याबद्दल महाराष्ट्र अॅकॅडमीवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात स्टिकर्स लाऊन, विद्रूपीकरण केल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९९५ कलम २४४ अंतर्गत वाकड पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. ११) रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अॅकॅडमीचे ऋषिकेश आठवले यांच्या नावाने ही तक्रार ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरिक्षकांने दिली आहे. आतापर्यंत अशा प्रकारे ६ जणांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहे.














