न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- घरमालकाच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून नोकराने घरातील आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. ११) रोजी रात्री आठच्या सुमारास महेशनगर, पिंपरी येथे उघडकीस आली.
काशीनाथ नेरकर (७७), सुमन नेरकर (६७) आणि दीपक नेरकर (५०, सर्व रा. महेशनगर, पिंपरी) या तिघांना जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले आहे. एअर फोर्समध्ये ग्रुप कॅप्टन असलेल्या दीपक यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या आई वडिलांवर कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.














