न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० एप्रिल २०२६) :- दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहूफाटा, आळंदी येथील आराम लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एक आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे. ही कारवाई १९ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश बाबाजी डुंबरे (वय ३२, रा. देहूफाटा, आळंदी) याला अटक करण्यात आली आहे. तर विजय गणेश शेट्टी (रा. देहूफाटा, आळंदी) हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार अरुण खंडू डामसे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला कामाचे आमिष दाखवून तिच्याकडून वैश्याव्यवसाय करून घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवली जात असल्याचेही समोर आले आहे.
छाप्यात पोलिसांनी सुमारे १९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक शिंगारे यांनी केले असून, पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.











