न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- पिंपळे सौदागर येथील आरोग्य विभागातील सफाई कर्मचा-यांच्या मुलांचा चांगल्या गुणांनी कठीण परिस्थितीत अभ्यास करून १० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ पिंपळे सौदागर आरोग्य विभाग व मे. शुभम उद्योग, सनराज असोसिएटस पिंपरी यांचे वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सुरज सुनिल शेळके ८७ % , आस्मिता रमेश भिसे ८२ टक्के, ज्योती ज्ञानेश्वर शेडगे ६० % या विद्यार्थ्यांना आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई आरोग्य सहाय्यक दिपक माकर व शिरीष कोकाटे, योगिनी निंबाळकर सर्व महिला व पुरुष कर्मचारी उपस्थित होते.

















