न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या साने चौक, चिखली येथील कार्यालयावर नुकताच सशस्त्र हल्ला करण्यात आला.
या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना कडक शिक्षा करण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे आज बुधवार (दि. १२) रोजी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची भेट घेणार आहेत.
एका नगरसेवकाच्या कार्यालयावर अशा प्रकारे हल्ला करण्याचा हा प्रकार निंदनीय असून, त्यात घातपात करण्याचा इरादा असू शकतो. त्यामुळे महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार व पदाधिकारी आज बुधवारी (दि. १२) रोजी दुपारी चार वाजता पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जाणार आहे, असे विरोधी पक्षनेते साने यांनी सांगितले.














