न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- एपीआय देशमुख यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या. १६ मे २०१९ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सुधीर त्यांच्या बहिणीला घेऊन सासरी सोडण्यासाठी आले. देशमुख हे भोसरीमधील अधिकारी निवास पोलिस लाईन येथे राहतात. त्यावेळी देशमुख यांनी सुधीर यांना शिवीगाळ केली. तसेच सुधीर यांच्या बहिणीला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने डोक्यात मारले.
यामध्ये सुधीर यांची बहिण गंभीर जखमी झाली. याबाबत सुधीर विठ्ठलराव भवर (वय ३९, रा. हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली) यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) विकास देशमुख यांच्यासह त्यांच्या आईवर हिंगोलीतील हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हट्टा पोलीस ठाण्यातून हा गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांची बहीण अद्याप एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आले नाहीत. त्यांचा जबाब घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर म्हणाले.














