न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १६ येथील रावेत व किंवळे येथे आज (दि. ११) रोजी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
सदर कारवाईमध्ये आर. सी. सी. ०६, विट बांधकाम ०१, मो. टॉवर ०१, पत्राशेड ०४ असे एकुण १२ बांधकाम ९१५७. ४७ चौ. फुट बांधकाम (८५०. ७५ चौ. मी.) एकुण १२ बांधकामावर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता अनिल शिंदे, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांचे पथकाने केली. ०१ ब्रेकर, ०२ ट्रॅक्टर, ०१ जे. सी. बी, १० मजुर तसेच कारवाई देहूरोड पोलीस स्टेशन येथील, ०१ सहायक पोलीस निरीक्षक, ०१ पोलीस उपनिरीक्षक, ०५ पोलिस कर्मचारी यांच्या बंदोबस्तमध्ये कारवाई करण्यात आली.


















