न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- केंद्र शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या अमृत अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाणी पुरवठा, मलनिःसारण व हरित क्षेत्र विकास प्रकल्प सुरु आहेत.
सदर प्रकल्पांसाठी होणारा खर्च र. रु ३९६.४१ कोटी इतका असून प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी केंद्र व राज्य शासनाचा मंजूर हिस्सा ५० टक्के म्हणजे र. रु १९९.३४ कोटी इतका आहे. योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाचा मंजूर हिस्सा एकूण र. रु. १९९.३४ कोटी पैकी र. रु. २५.५६ कोटी इतका निधी सोमवार (दि. १०) रोजी राज्य शासनामार्फत महानगरपालिकेस वितरित करण्यात आलेला आहे.
प्रकल्पानुसार वितरित निधीचा तपशील खाली नमूद केल्याप्रमाणे :-
क्र प्रकल्पाचे नाव वितरित निधी (किंमत रु. कोटी ) वितरित हफ्ता केंद्र शासन राज्य शासन एकूण
१ पिंपरी चिंचवड पाणी पुरवठा योजना (टप्पा १) ७.८४ ३.९२ ११.७६ दुसरा
२ पिंपरी चिंचवड पाणी पुरवठा योजना (टप्पा १) ८.३५ ४.१७५ १२.५३ दुसरा
३ प्रभाग क्र. १६, आकुर्डी येथे उद्यान विकसित करणे ०.००१६ ०.००८ ०.०२४ तिसरा
४ पुनावळे प्रभाग क्र. ५२ (जुना) येथील उद्यान विकसित करणे ०.२९ ०.१४५ ०.४३५ दुसरा
५ चऱ्होली येतील आ. क्र. २-६४ (तसेच फ प्रभागातीलसीडीसी प्लॉट क्र. १ व ३ ) येथील जागेवर उद्यान विकसित करणे ०.५४४ ०.२७२ ०.८१६ दुसरा
एकूण १७.०४ ८.५२ २५.५६
यापूर्वी पहिल्या हप्त्यापोटी र.रु. ३२.५७ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असून ती रक्कम महानगरपालिकेकडून सदर प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी वापरण्यात आला आहे. सदर प्रकल्पांचे काम नियोजनाप्रमाणे सुरु असून ती नियोजित वेळेत पूर्ण होईल यावर महानगरपालिकेकडून विशेष लक्ष दिले जात आहे.














