न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- पावसाळा सुरु होण्यापूर्वी वीज पुरवठ्याची कामे करण्यात येणार आहेत. उद्योजकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तशा सुचना सहायक अभियंत्याना दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अभियंता सचिन तालेवार यांनी दिली.
खंडित विजपुरवठ्याबाबत लघुउद्योजकांनी तालेवार यांच्याशी चर्चा केली. या वेळी ते बोलत होते. तालेवार म्हणाले की, महापालिकेसोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये झाडे कापण्याबाबत नियोजन केले जाणार आहे.
उघडे डीपी व फिडरला पावसाळा सुरु होण्याच्या आधी झाकणे लावण्यात येणार आहेत. उद्योजकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे सचिव जयंत कड, संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ आदी यावेळी उपस्थित होते.


















