न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव हे ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे आयोजित आशिया पॅसिफिक शहरांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. ही परिषद ७ ते १० जुलै या कालावधीत होणार आहे. यासाठी येणा-या ४ लाख ८० हजार रुपये विमान प्रवास व खर्चाला स्थायी समितीने बुधवारी (दि. १२) रोजी परवानगी दिली.
या परिषदेत १०० शहराचे १ हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शहरे गतिमान बनविणे, शहरांची स्थिरता, राष्ट्रीय गतिशिलता, नवनिर्माण करण्याची क्षमता आदींबद्दल परिषदेतमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. महापौर जाधव या परिषदेत सहभागी होणार आहेत.


















