न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ मे २०२६) :- नसरापूर व चाकण येथील बाल लैंगिक अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ पिंपरी चौकातील भीमसृष्टी स्मारकासमोर काँग्रेस व पुरोगामी संघटनांनी आंदोलन केले. वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री व अधिक पोस्को न्यायालयांची गरज असल्याचे सांगितले.
संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी आरोपीला तात्काळ फाशीची मागणी केली. ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांनी व्यवस्थेवर कठोर प्रश्न उपस्थित केले.
या आंदोलनात समरीन कुरेशी, गिरिजा कुदळे, कल्पना गीते, सोमनाथ शेळके, अभिमन्यू दहिफुले, जितेंद्र छाबडा यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच अशोक मोरे, विष्णुपंत नेवाळे, उमेश खंदारे, सत्यजित बिरादर, प्रकाश जाधव, आबासाहेब ढवळे, वसंत पाटील, अशोक सातपुते, अनिल कारंजेकर, दिलीप कैतके, प्रवीण कदम, सुलभा यादव, मोनिका भोसले, कौशल्या जाधव, शितल मोरे, सोनिया दिलपाक, शहाबुद्दीन शेख, आनंदा कुदळे, हिराचंद जाधव, विजय ओव्हाळ, राजन नायर, बाबा गायसमुद्रे, सार्थक बाराथे, मयूर रोकडे, पांडुरंग जगताप, भास्कर नारखेडे, राजेंद्र काळभोर, रफिक कुरेशी आदी उपस्थित होते.














