- धूळ प्रदूषण रोखण्यासाठी ४ प्रकल्प सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ मे २०२६) :- शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने आरएमसी प्रकल्पांवर विशेष तपासणी मोहीम राबवित ४ प्रकल्प सील केले. पुनावळे, मोशी व पिंपळे सौदागर परिसरातील १० प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी फरांदे आरएमसी (मोशी), यश आरएमसी (चिंचवड), राम ग्रुप क्रिस्टल वन (मोशी) व आसवानी असोसिएट्स जी.के. आरएमसी (पिंपळे सौदागर) येथे धूळ नियंत्रणाची यंत्रणा नसणे, स्वच्छतेचा अभाव व कच्चा माल उघड्यावर साठविल्याचे आढळल्याने कारवाई करण्यात आली.
महापौर रवी लांडगे यांनी धूळ प्रदूषणावर तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट केले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी कठोर कारवाई सुरू राहील, असे सांगितले. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे नमूद केले.
नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.














