- स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सफाई सेवकांसाठी स्वच्छता विषयक क्षमता वृद्धी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६च्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात ३ हजार ५०० सफाई सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सफाई सेवकांची शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले.
कार्यशाळेत सफाई सेवकांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (PPE किट) वापरणे, आरोग्य व सुरक्षितता, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ तसेच कचरा संकलन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














