न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : लायन्स क्लब ऑफ पुणे सफायरच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने पोलिसांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी महाशिबिरात २५० जणांची तपासणी करण्यात आली.
चिंचवड येथील पिंपरी पोलीस स्टेशन येथे हा कार्यक्रम पार पडला. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, उप प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, रिजन चेरमन आनंद मुथा, झोन चेरमन सत्येन भास्कर, सफायर क्लब च्या अध्यक्षा सरला जॉय, आयोजक अब्दुल जाफर, हरिदास नायर, जॉय जोसेफ, व्ही. एम. कबीर, राजन नायर आदी उपस्थित होते.
यावेळी शहा म्हणाले कि, पोलीस कर्मचारी जागतात तेव्हा समाजातील नागरिक शांत झोपतात. सण उत्सवाच्या काळात ते १२ -१२ तास ड्युटी करतात त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून लायन्स क्लबने हे शिबीर आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी पोलीस व त्यांच्या कुटूंबियांच्या रक्तदाब, मधुमेह, दंत, नेत्र तपासणी, इसीजी, अस्थी, कान- नाक-घसा, कर्करोग आदी तपासण्या केल्या.
या शिबिरासाठी आधार रक्तपेढीचे मकरंद शहापूरकर, आस्था रुग्णालयाचे डॉ श्याम शिंदे, डॉ ललिता पिल्ले, रुबिया झाकीर, डॉ सरिता सोनावळे, सत्येंद्र पांडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. हरि नारायणन यांनी तर आभार बिनॉय जाफर यांनी मानले.