- “अनं जबाबदारी घ्यायला हिम्मत लागते”..
- “मतलबी लोकांपासून सावध रहा”..
- माजी आमदार विलास लांडे यांची ती व्हायरल पोस्ट चर्चेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी, (दि. १३ मे २०२६) :- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर विलास लांडे (Vilas Lande) यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावनिक आणि प्रेरणादायी पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित झालेल्या या संदेशामध्ये जीवनातील संघर्ष, स्वाभिमान, सकारात्मक विचार, जबाबदारी आणि नातेसंबंध याबाबत प्रभावी भाष्य करण्यात आले आहे. “कठीण परिस्थितीत माणसाला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही”, “जबाबदारी घ्यायला हिम्मत लागते” तसेच “आनंदी स्वभावाने परिस्थिती अनुकूल बनवता येते” अशा ओळींमधून समाजाला सकारात्मक दृष्टिकोनाचा संदेश देण्यात आला आहे.
तसेच, जीवनातील अनुभवातून शिकण्याचे महत्त्व, मतलबी लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला आणि स्वतःच्या कर्माचे आत्मपरीक्षण करण्याची गरज यावरही या पोस्टमध्ये भाष्य करण्यात आले आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रापासून सध्या काहीस अलिप्त झालेले विलास लांडे यांच्या या संदेशाची नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट पुढे शेअर करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.













