न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ मे २०२६) :- भक्ती, संगीत आणि आत्मशोधाचा प्रवास घडवणारे ‘अंतर्नाद’ या भव्य संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार, दि. १६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व मोरया थिएटरचे संस्थापक भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
५१ कलाकारांच्या सहभागातून सादर होणाऱ्या या नाटकात अभंग, गवळण, भारूड आणि पोवाड्यांचा समावेश आहे. पंढरीच्या वारीचा आध्यात्मिक अनुभव आणि एका युवा वारकऱ्याचा अंतर्मनातील प्रवास या नाटकातून उलगडणार आहे. नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून दिग्दर्शन मनोज डाळिंबकर यांचे आहे.
‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’वर तिकिटे उपलब्ध आहेत.














