- रमामंगल फाउंडेशनच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा व नागरिकांसाठी विविध मोफत सेवा शिबीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ मे २०२६) :- चिंचवड येथील शिवसेना पुणे जिल्हा संघटक तथा रमामंगल फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष संतोषभाऊ सौंदणकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार (दि. १५) विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रमामंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अभिष्टचिंतन सोहळ्यासह नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांशी संबंधित मोफत सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड येथील रस्टन कॉलनीतील गुरुकृपा हौ. सोसायटी येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडणार असून नागरिकांना आयुष्मान कार्ड, ABHA कार्ड, एसटी बसचे NCMC कार्ड तसेच प्रधानमंत्री वय वंदना कार्ड यांसारख्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. शिबिरामध्ये आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री वय वंदना कार्डमुळे विमा कवच. NCMC कार्डमुळे एसटी बस प्रवास अधिक सुलभ होणार आहे. आयुष्मान कार्डद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य विमा आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा मिळणार आहेत. तसेच ABHA कार्डमुळे नागरिकांना डिजिटल हेल्थ आयडी सुविधा उपलब्ध होणार आहे.
सायंकाळी ७ वाजता संतोषभाऊ सौंदणकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.














