- पिंपरी-चिंचवड महापालिका महासभेत उपसूचनेस मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड ( दि. १६ मे २०२६ ) :- टाळगाव चिखली येथील टाऊन हॉलला “जगद्गुरू संत तुकाराम महाराज टाऊन हॉल” असे नामकरण करण्याच्या उपसूचनेस पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. महापौर रवि लांडगे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली.
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा टाऊन हॉल उभारण्यात आला आहे. टाळगाव चिखली परिसर संत तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेला मानला जातो. संत तुकोबांनी येथे टाळ ठेवले होते, त्यामुळे गावाला “टाळगाव चिखली” हे नाव पडल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे.
संत तुकाराम महाराजांच्या समता, मानवता आणि भक्तीच्या विचारांना अभिवादन म्हणून हे नामकरण करण्यात आले आहे. स्थानिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ही उपसूचना नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी मांडली, तर निखिल बोऱ्हाडे यांनी अनुमोदन दिले.













